..म्हणून रद्द झाली दिल्लीतील काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक!

Sunil Tatkare

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या पृष्ठभूमीवर दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक आज मंगळवारी होणार होती. मात्र अचानक ही बैठक रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना पेव फुटले. दरम्यान, ही बैठक का रद्द करण्यात आली, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.

माध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार होती. मात्र, आज माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची जयंती आहे. त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते तिकडे व्यस्त राहणार आहेत. त्यामुळेच आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक उद्या बुधवारी होईल. उद्याच्या या बैठकीला राष्ट्रवादीकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील हे नेते उपस्थित असतील. तर काँग्रेसकडूनही केंद्रातील आणि राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील, अशी माहितीही त्यांनी दिली.