‘या’ कारणासाठी ऐश्वर्याने दिला ‘छपाक’ला नकार

मुंबई : ‘छपाक’ चित्रपटात अ‍ॅसिड अ‍टॅक सर्व्हायव्हर लक्ष्मीचे आयुष्य साकारणाऱ्या दीपिका पदुकोणचे सध्या प्रचंड कौतुक होत आहे. दीपिकाच या भूमिकेसाठी परफेक्ट असल्याची भावना प्रेक्षकांमधून व्यक्त होत आहे. मात्र या भूमिकेसाठी दीपिका ही पहिली निवड नव्हती, तर पहिल्यांदा प्रियंका चोप्रा, कंगना राणावत, श्रद्धा कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चनला विचारण्यात आले होते. या अभिनेत्रींनी या भूमिकेसाठी नकार दिला.

या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी प्रियंका चोप्रा परदेशात होती. त्यावेळी तिला पुरेसा वेळ देणे शक्य नव्हते. त्यामुळे तिने नकार दिला. तर कंगना राणावतच्या बहिणीवरही अ‍ॅसिड हल्ला झाला असल्याने ही भूमिका तिच्यासाठी फार इमोशनल ठरली असती. त्यामुळे तिने नकार दिला. तसेच श्रद्धा कपूरने नकार दिला; कारण तिला या वयात कुरूप दिसणारी कोणतीही भूमिका करायची नाही. तर अनुष्का शर्माकडे पुढील दोन वर्षांसाठी अनेक चित्रपट होते. त्यामुळे पुरेसा वेळ नसल्याने तिनेही नकार दिला. परंतु ऐश्वर्या राय बच्चनच्या नकाराचे कारण मात्र वेगळेच आहे. ऐश्वर्या ही जगातली सुंदर व्यक्ती म्हणून ओळखली जाते. तिने ‘मिस वर्ल्ड’चा किताबही जिंकला आहे. छपाकला नकार देताना तिने ‘मला मोठ्या पडद्यावर कधीच कुरूप नाही दिसायचं’ असं कारण दिलं असल्याचा दावा लेखक राकेश भारती यांनी एका मुलाखतीत केला.