पंकजा मुंडे आणि रोहित पवारांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार – सुजय विखे

Sujay Vikhe-Rohit Pawar-Pankaja Munde

मुंबई : ऊसतोड कामगारांच्या हितासाठी सगळ्यांनी मिळून काही तरी करायला हवं. माझ्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar), भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या शिक्षण संस्था आहेत. आम्ही जर सर्व एकत्र आलो तर ऊसतोड कामगारांसाठी चांगलं काम करता येईल. सर्वांनी मिळून राजकीय पक्ष बाजूला ठेवून मनापासून हे काम करायला हवं. यासाठी पंकजा मुंडे किंवा रोहित पवार यांनी नेतृत्व केलं तरी आम्ही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहोत.

आमचं काही म्हणणं नाही. कुणीही नेतृत्व करा; पण पक्षाच्या पलीकडे जाऊन चांगल्या विचारांनी काम करूया, असं परखड मत भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी ‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात वक्तव्य  केलं. यावेळी सुजय विखे (Sujay Vikhe) म्हणाले की, पंकजाताईंचा आणि आमचा जिल्हा मुळात ऊसतोड कामगारांचे उगमस्थान आहे. ऊसतोड कामगारांचा प्रश्न महाराष्ट्रासमोर आणण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. त्यांच्याबरोबर माझे आजोबाही होते. खरं तर त्यांच्यामुळेच कामगारांच्या या अडचणीदेखील आहेत ते समोर आलं. रोहित पवार, पंकजा मुंडे यांनीदेखील मत मांडलं. त्यांनी पुढाकार घेऊन नेतृत्व केलं तर आमचा त्यांना पाठिंबा आहेच; कारण त्यांनी त्या गोष्टी फार जवळून पाहिल्या आहेत, असं सुजय म्हणाले.

आज आम्ही तरुण आहोत. आमच्या सर्वांचा कारखाना आहे. किंबहुना आम्ही जेवढे तरुण  आमदार-खासदार असू ज्यांचे कारखाने आहेत, त्यांनी सर्वांनी म्हणजे मला तरी वाटतं एकत्र बसलं पाहिजे. प्रत्येकाने काही जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत. फंड तयार करून शिक्षणाची किंवा रुग्णालयाची जबाबदारी घेऊ शकतो का आपण, यावर चर्चा व्हायला हवी, अशी भूमिका सुजय विखे पाटील यांनी मांडली. उदाहरणार्थ नगर जिल्ह्यात बरेच साखर कारखानदार आहेत. समजा माझं ७०० बेड्सचं रुग्णालय आहे. काम करत असताना ऊसतोड कामगारांना कोणतीही इजा झाली तर हे रुग्णालय त्यांच्यावर मोफत उपचार करेल. त्यानंतर कारखाना नंतर पैसे देईल. त्यासाठी मी एक वर्ष थांबू शकतो. मला लगेच पैशांची आवश्यकता नाही. मी म्हणत नाही की, आपण फार काही बदल करू शकू; पण पाच लोकांचं कुटुंब जरी घडवलं तर या पत्राला ५ टक्के उत्तर दिलं असं होईल, असं मला वाटतं, असं सुजय विखे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER