शेतकऱ्यांसाठी भाजपमध्येही जाण्यास तयार – बच्चू कडू

Bacchu Kadu

अहमदनगर : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंबंधी केलेल्या कायद्यात 2 महत्त्वाचे बदल केले तर मी भाजपमध्ये जाण्यास तयार आहे, असा खळबळजनक दावा जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला आहे. बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांना 50% नफा धरून हमी भाव द्यायला पाहिजे आणि शेतमाल खरेदीची हमी सरकारने घेतली पाहिजे, हे 2 बदल केंद्र सरकारने केले तर मी भाजपमध्ये जाऊन त्यांची सेवा करेन.

दरम्यान यावेळी बिहार निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, बिहार निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला हवं तेवढं यश मिळालं नाही. निवडणुकीत कमी-जास्त सुरु राहतं, मात्र भाजपला मोठं यश मिळालेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER