‘कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार’, फडणवीसांच्या आरोपावर परबांचे प्रत्युत्तर

Anil Parab - Devendra Fadnavis

मुंबई :- मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात एनआयएच्या (NIA) अटकेत असलेल्या सचिन वाझेंवरुन भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shiv Sena) आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. आपण मुख्यमंत्री असताना सचिन वाझेंना (Sachin Vaze) पुन्हा सेवेत घेण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्याशी बोलले होते. तसंच शिवसेनेचे काही मंत्री आपल्याला भेटल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. त्यावरुन आता शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी फडणवीसांना आव्हान दिलं आहे.

सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी शिवसेनेने मागणी केली, या गोष्टीत कुठलेही तथ्य नाही. फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ॲडव्होकेट जनरल यांचं मत घेतल्याचं सांगितलं हाही. त्यांनी कधी लेखी मागितले आणि ॲडव्होकेट जनरल यांनी कधी लेखी दिलं, हे फडणवीसांनी दाखवावं, असं आव्हान अनिल परब यांनी दिलं आहे. तसंच कोणतीही चौकशी करावी. कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत. आम्ही काही घाबरुन कुठली चौकशी करु नये, अशी विनंती करणार नाही. कुठलीही चौकशी करायला यंत्रणा मोकळी आहे. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, असंही परब म्हणालेत. दरम्यान, परमवीर सिंह यांच्या बदलीबाबत गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिलेलं कारण, यावर परब यांनी काढता पाय घेतला.

ही बातमी पण वाचा : एसटी महामंडळात ‘लक्ष्मी दर्शन’ शिवाय काहीच होत नाही’, भाजपाचा परब यांच्यावर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER