राजू शेट्टी यांच्याशी कुठेही चर्चा करण्यास तयार : चंद्रकांत पाटील

Raju Shetti & Cahndrakant Patli

कोल्हापूर :- केंद्र शासनाने नव्याने केलेले कृषी कायदे हे शेतकरी फायद्याचे आहेत, असे चंद्रकांत पाटील सांगत आहेत. मग त्यांनी कोल्हापुरातील  बिंदू चौकात येऊन जाहीर चर्चा करावी. आम्हाला कृषी कायद्याचे महत्त्व  सांगावे, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिले. यावर कुठेही चर्चा करण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.

माजी खा. राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या चर्चेच्या आव्हानाला उत्तर देताना ते म्हणाले, कोणीही कोठेही बोललावे आणि आम्ही चर्चा करावी असे होणार नाही. अशा वेळी चर्चा होईलच असे नाही. परंतु  एखाद्या त्रयस्थ संस्थेमार्फत कायद्याबाबत विरोधकांशी आमने-सामने कुठेही चर्चा करण्यास तयार आहोत. बंद पुकारला की ९० टक्के लोक स्वत:हूनच व्यवसाय बंद करतात. कोण कशाला वाकडे घेईल? महाद्वार  रोडवरील फुलवाला वाकडे घेईल की केळी-भाजी विकणारी ताई बंद विरोधात भांडत बसेल? बंदमध्ये बळजबरी होते, कोणी तरी दगड मारणार, टायर फोडणार त्यापेक्षा एक दिवस घरात बसलेले बरे म्हणून लोक घरी बसले. हेच आजच्या बंदमध्ये झाले आहे. बंद यशस्वी झाला असे म्हणण्यास काही अर्थ नाही.

ही बातमी पण वाचा :  शेतकरी आंदोलनामुळे भाजपला राजकीय फायदाच होईल : आ. चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER