शिवरायांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान अन् अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही द्यायला तयार : कंगणा राणौत

Kangana Ranaut

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगणा राणौतने (Kangana Ranaut) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई (Mumbai) पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगणाच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यापार्श्वभूमीवर कंगना आज मुंबईत दाखल होणार असून तिने प्रवासाला सुरुवात केली आहे. त्याआधी तिने ट्विट केले असून हे तिचे दुसरे ट्विट आहे .

कंगना राणौतनं ट्विटवरुन पुन्हा एकदा शिवसेनेवर नाव न घेता निशाणा साधला . कंगनाने म्हटलं आहे की, मी वयाच्या १२ वर्षी हिमाचलसोडून चंढिगड येथे हॉस्टेलला गेली. तिथून दिल्लीत आली त्यानंतर १६ व्या वर्षी मुंबईत आली. काही मित्रांनी सांगितले मुंबईत तोच राहतो ज्याला मुंबादेवी ठेवते. आम्ही सगळे मुंबादेवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. सर्व मित्र परतले पण मुंबादेवीने मला तिच्या जवळच ठेवले असे ती म्हणाली.

तसेच मुंबईत माझं घर आहे. महाराष्ट्राने मला सगळंकाही दिले हे मला मान्यच आहे. पण मीदेखील महाराष्ट्राला माझ्या भक्ती आणि प्रेमाने एक मुलगी म्हणून भेट दिली आहे. जी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान आणि अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही द्यायला तयार आहे, जय महाराष्ट्र असं अभिनेत्री कंगना राणौतनं ट्विट केले आहे.

दरम्यान कंगणा रणौत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगणाच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेने तिचा चांगलाच समाचार घेतला . यावर मुंबई कुणाच्या बापाची नाही, 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे हिंमत असेल तर अडवून दाखवा , असे खुले आव्हान कंगनाने शिवसेनेला दिले आहे . यावरून चांगलेच वादंग पेटले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER