सलमान खानच्या ‘रेडी’ चित्रपटातील अभिनेत्याचे निधन

Mohit Baghel

मुंबई : सलमान खानसोबत ‘रेडी’ चित्रपटात काम केलेला अभिनेता मोहित बघेल याचे निधन झाले आहे. तो केवळ २७ वर्षांचा होता. कर्करोगामुळे त्याचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोचे दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी ट्विट करून मोहितच्या निधनाची बातमी दिली. मोहित लहानपणापासून कर्करोगग्रस्त होता. अखेरच्या काही दिवसांमध्ये तो नोएडा येथील रुग्णालयात उपचार घेत होता. परंतु कर्करोगाचा प्रभाव वाढल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले.

२०११ मध्ये मोहितने सलमान खानसोबत ‘रेडी’ चित्रपटात छोटी अमर चौधरी ही भूमिका साकारली होती. त्याशिवाय त्याने ‘जय हो’ या सुपरहिट चित्रपटातही भूमिका साकारत आपली वेगळी ओळख बनवली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER