‘आरे’ वाचलं: राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत

Nawab Malik - Aarey - CM Uddhav Thackeray

मुंबई : फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) काळात वादात सापडलेल्या मेट्रो कारशेडचे कांजूरमार्ग येथे स्थलांतर करून मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या मनातील निर्णय घेतला आहे, असे राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटले आहे.

मुंबईतील (Mumbai) पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी गोरेगावच्या आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड आता कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतलेला निर्णय रास्तच आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) या निर्णयाचे रविवारी स्वागत केले आहे.

हे कारशेड आरेमध्येच व्हावे म्हणून तत्कालीन सरकारने रात्रीच्या अंधारात आरे कॉलनीतील शेकडो झाडे कापून पर्यावरणाचा ऱ्हास केला आणि पर्यावरणाच्या प्रश्नावरील आपली वृत्ती दाखवून दिली होती. मात्र, विद्यमान मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण व जनहिताचा निर्णय घेऊन रास्त निर्णय घेतला आहे, असे मलिक म्हणाले.

आरेच्या कारशेडवरून मागील सरकारमधील भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shiv Sena) वाद निर्माण झाला होता. समृद्ध वनसंपदा असलेल्या आरेतील झाडे कापण्यास पर्यावरणवाद्यांचा स्पष्ट विरोध होता. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) सत्तेत आल्यानंतर आरेच्या मेट्रो कारशेडला स्थगिती देण्यात आली होती. या प्रश्नी अभ्यासगट नेमून आलेल्या अहवालाच्या आधारे हे कारशेड स्थलांतरीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने घेतलेला आहे, असे मलिक म्हणाले.

कांजूरमार्गला कारशेड स्थलांतरीत केल्यामुळे आठ कि.मी.चा प्रवास वाढेल. पण यामुळे त्या भागातील सुविधा निर्माण होतील असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER