नाना पटोलेचा राजीनामा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज; संजय राऊतांचा दुजोरा

मुंबई : काँग्रेसने महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले (Nana Patole) यांची नियुक्ती केली. यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या पदासाठी पुन्हा निवडणूक होणार आहे. या घडामोडींमुळे मुख्यमंत्री (CM Uddhav Thcakeray) व उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) नाराज असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्याला दुजोरा दिला आहे.

याबाबच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, अशा घटनात्मक पदाच्या निवडणुका वारंवार होऊ नये, असे आम्ही सामनात म्हटले आहे. पाच वर्षांसाठी अध्यक्षपद असते. त्यामुळे अध्यक्षपदावरील व्यक्तीने राजीनामा दिल्याने पुन्हा निवडणूक होते. महाविकास आघाडीचे सरकार आहे. तीन पक्षांचे बहुमत आहे. तरी या गोष्टी टाळायला हव्यात.

विधानसभा अध्यक्षपदाबद्दल पुन्हा चर्चा होणार

विधानसभा अध्यक्षपदासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेबद्दल राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले, यावर पुन्हा चर्चा होईल. काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिले होते, ते पाच वर्षांसाठी. तेव्हा कुणाला माहिती नव्हते की, विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक होईल. आता पुन्हा निवडणूक का? याचाही काँग्रेसनं विचार करायला हवा होता. ठीक आहे. काँग्रेसनं निर्णय घेतला आहे. तीन पक्ष बसून निर्णय घेतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER