पाकिस्तानातून जीव वाचवून अमृतसरला पोहचल्या, छावणीत मिळालं हरवलेलं प्रेम !

Maharashtra Today

इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य दिलं परंतु देश दोन हिश्श्यात विभागला गेला. दंगली उसळल्या. अनेकांचं परिवार, घर त्यांच्यापासून कायमचं दुरावलं गेलं. लाहोरच्या गुंजरवालामधली एक २२ वर्षीय मुलगी प्रितम कौर (Pritam Kaur) यांच्या परिवारानं त्यांना ट्रेनमध्ये बसवलं. त्यांना आशा होती की ही ट्रेन त्यांच्या मुलीला क्रुर दंगलींपासून बाहेर घेऊन जाईल. हातात बॅग पकडून जॅकेट घातलेली आणि सोबत दोन वर्षाच्या भावाला सोबत घेऊन प्रतिमनं प्रवास सुरु केला. तिला कल्पनाही नव्हती तिचं भविष्य काय आणि कसं असणार आहे. तिच्या सर्व आठवणींच साक्षिदार असणारं जॅकेटच तिच्या जवळची सर्वात महाग गोष्ट होती.

स्वतःच्या नशिबाला दोष देत तिनं शहर सोडलं. तिथं तिचं बालपण गेलं. तिचे आई वडील तिथं होते. उद्याचे सुंदर दिवस होते पण फाळणीनं साऱ्यावरच पाणी फेरलं. आता सर्वच माग पडत होतं. काही दिवसांपुर्वीच त्या ‘भगवान मौनी सिंग’ यांना भेटल्या होत्या. तो एक ३० वर्षाचा तरुण होता. यांच्यासोबतच प्रितम यांचा साखर पुडा झाला होता. त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याला ही खबर सुद्धा नव्हती की प्रितम कौर पाकिस्तान कायमाचा सोडून भारतात जात आहेत. नशिबाला प्रितम यांनी कितीही दोष दिला असला तरी नशिब त्यांच्या बाजूनं होतंय

त्यावेळी दंगलीत त्यांचा जीव गेला असता. ज्या ट्रेनमध्ये त्या होत्या ती ट्रेन कधीच अमृतसहला पोहचली नसती. पण त्या ठिकठाक अवस्थेत स्थलांतरीतांच्या छावणीत पोहचल्या. भगवान सिंग प्रितम यांच्यापासून २५० किलोमीटरच्या अंतरावर होते. त्यांनी दंगली जवळून बघितल्या होत्या. त्यांच्या तिन्ही भावांची या दंगलीत हत्या झाली होती. एका सुटकेसमध्ये सामान भरुन प्रॉपर्टीचे कागद घेऊन ते अमृतसरला आले.

पुढं प्रितम आणि भगवान त्याच १ कोटी २० लाख लोकांच्या सोबत त्या छावणीत राहणार होते जिथं दंगलीत सर्वस्व गमावून जीव वाचलेले स्थालांतरीत राहणार होते. या छावण्या कोण्या भयानक अनुभवापेक्षा कमी नव्हत्या. एकाच तंबुत अनेक परिवार रहात होती. शाररिक आणि मानसिकरित्या आधीच खच्चीकरण झालेल्या लोकांसाठी अशा ठिकाणी राहणं निव्वळ अशक्य गोष्ट होती. खान्याचे पॅकेट्स भरुन रोज एक ट्रक तिथं यायचा लाइनमध्ये उभा राहून सर्वांना जेवण घ्यावं लागायचं. एक दिवस प्रतिम त्या लाइनमध्ये होत्या तेव्हा मागून आवाज आला, “तुम्ही त्याच आहात ना?”

प्रितमनं मागं वळून पाहिलं तर तिचा होणारा नवरा भगवानसिंग होते. तो जिवंत वाचला असेल असं सुद्धा प्रितमला वाटलं नव्हतं. यानंतर दोघे एकमेकांशी भेटत राहिले. एकमेकांच्या कुटुंबीयांबद्दल ते नेहमी एकमेकांसमोर दुःख व्यक्त करायचे. अमृतसरला आल्यानंतर दोघांनी एकमेकांना आधार दिला. १९४८ साली एका छोटे खानी कार्यक्रमात दोघे विवाह बंधनात अडकले. हळू हळू दंगली शांत झाल्या. यानंतर भगवानसिंग ‘ज्युडीशिअर सर्विसेस’ मध्ये नोकरीला लागले. यानंतर त्यांनी कुटुंबाचे पालन पोषण व्यवस्थित केले.

२००२ साली प्रितम यांचा मृत्यू झाला. याच्या ३० वर्षांआधीच भगवानसिंग यांनी जगाचा निरोप घेतला होता. दंगलीच्या भडक्यात सुद्धा त्यांनी स्वतःच्या प्रेमाला जळू दिलं नाही. भारत पाकिस्तानाच्या दंगलीत त्या दोघांच झालेलं लग्न एकमेव सकारात्मक गोष्ट होती असं अनेक जण सांगतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button