‘आदर्श’ घोटाळ्याची पुन्हा चौकशी?

मुंबई :- कुलाबा येथील वादग्रस्त आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालयाकडून पुन्हा चौकशी सुरू झाली आहे. या घोटाळ्यामुळेच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, हे उल्लेखनीय. काँग्रेसचा समावेश असलेल्या महाआघाडीचं नवं सरकार स्थापन होते आहे. या सरकारमध्ये अशोक चव्हाण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच आदर्श घोटाळ्याची चौकशी सुरू झाल्यानं त्यांच्या अडचणी वाढू शकतात.

उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण यांचा समावेश जवळ जवळ नक्की आहे; पण त्याआधी ईडीचे अधिकारी बुधवारी कुलाबा येथे आदर्श गृहनिर्माण संस्थेत पोहचले आणि फ्लॅटची मोजणी केली. याबाबत अधिकाऱ्यांनी काहीही सांगितले नाही; पण सूत्रांच्या माहितीनुसार गृहनिर्माण संस्थेविरोधात कारवाईसाठी मालमत्तेची माहिती घेण्यात आली आहे.

‘ आम्ही नाही म्हणालो राम मंदिर नको बनवा, नाही अयोध्या दौरा रद्द केला….’