परमबीर सिंगच्या अडचणीत पुन्हा वाढ; तपास CIDकडे वर्ग; सूत्रांची माहिती

Parambir Singh

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. परमबीर सिंगविरोधात (Parambir Singh) दाखल एकूण तीन तक्रारींपैकी एका प्रकरणाचा तपास आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून CID कडे वर्ग करण्यात आला आहे. या संदर्भाची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतर दोन तक्रारींप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आपली गोपनीय चौकशी चालू ठेवणार आहे.

व्यावसायिक सोनू जालान, पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे आणि अनुप डांगे यांनी परमबीर सिंगच्याविरोधात तक्रार दाखल करत भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, परमबीर सिंग प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत असलेला तीन गोपनीय चौकशीपैकी सोनू जालान प्रकरणातील चौकशी आता (CID)कडे वर्ग करण्यात आला आहे. खंडणीच्या आरोपांसह इतर भ्रष्टाचारप्रकरणाचा तपासही आता CID करणार आहेत. तर उर्वरित दोन प्रकरणाची चौकशी एसीबी करणार.

परमबीर सिंगसह २७ पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात अकोल्यातील सिटी कोतवाल पोलीस ठाण्यात ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’सह आणखी २२ कलमान्वये गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा दाखल करून ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button