विजयासाठी भाजपकडून गैरप्रकार, राष्ट्रवादीकडून पंढरपूरमध्ये फेरनिवडणूक घेण्याची मागणी

Samadhan Autade - NCP - Maharashtra Today
Samadhan Autade - NCP - Maharashtra Today

मुंबई : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे (BJP) समाधान अवताडे (Samadhan Autade) यांनी चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना पराभूत केले. मात्र पंढरपूरमधील हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसला पचनी पडलेला दिसत नाही. पंढरपूर निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपा उमेदवार समाधान अवताडे आणि विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी गैरप्रकार केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने पंढरपूरमध्ये फेरनिवडणूक घ्यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य ॲड. नितीन माने यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र लिहिले आहे. विधान परिषद आमगार प्रशांत परिचारक आणि भाजपा उमेदवार समाधान अवताडे यांच्या कारखान्यात कार्यरत असलेले सर्व सभासद आणि कर्मचाऱ्यांनी तीन दिवस डांबून ठेवून भाजपाला मतदान करा अन्यथा कामावरून काढून टाकू, अशा धमक्या दिल्याचा संशय निर्माण होत आहे. असा प्रकार झाल्याचा संशय असल्याने मी पत्राद्वारे काही मागण्या करत आहे. प्रशांत परिचारक आणि समाधान अवताडे यांच्या कारखान्याच्या तसेच कार्यालयाच्या आणि घरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे. दोन्ही नेत्यांचे फोन संभाषण रेकॉर्डिंग तपासण्यात यावे. समाधान अवताडे यांच्या कंस्ट्रक्शन कंपनीचे पूर्ण ऑडिट तपासण्यात यावे. निवडणुकीदरम्यान प्रशांत परिचारक आणि समाधान अवताडे हे संचालक असलेल्या सर्व संस्था, कारखान्यातील आणि कंस्ट्रक्शन कंपनीच्या सर्व बँक खात्यांची चौकशी करावी. तसेच माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून सदर निवडणुकीची चौकशी करण्यात यावी. तसेच समितीच्या अध्यक्षतेखाली फेरनिवडणूक पारदर्शक पद्धतीने घेण्याात यावी, अशी मागणी या पत्रातून माने यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button