५०० रुपयांची नवी नोट लवकरच येणार चलनात – आरबीआय

rbi-500-notes

मुंबई : आरआयबी लवकरच 500 रुपयांची नवी नोट चलनात आणणार आहे. या संदर्भात आरबीआयने घोषणा केली असून नोटिफिकेशन जारी केले आहे.

500 नव्या नोटांमध्ये इनसॅट लेटर नसणार आहे. सोबतच इनसॅट लेटरमध्ये नंबर पॅनल्च्या खाली वॉरट मार्क असलेलं इंग्लिश अक्षर असणार आहे.
महात्मा गांधी नव्या सीरिजअंतर्गत या नोटा जारी केल्या जाणार आहेत. 500 च्या या नव्या नोटांवर आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असणार. तर या नोटांच्या मागे छपाईचं वर्ष 2016 छापलं जाईल.

आधीच्या आणि आताच्या नोटा कायदेशीररित्या चलनात राहतील, असंही आरबीआयने स्पष्ट केलं आहे.
या नोटांचं डिझाइन हे 8 नोव्हेंबर 2016 च्या नोटिफिकेशन अंतर्गत जारी केलेल्या नोटांसारख्याच असणार आहे.