‘क्रिप्टो ट्रेडर्स’ च्या खात्यांना मनाई नाही – रिझर्व्ह बँक

RBI - Reserve Bank Of India

मुंबई : व्हर्च्युअल चलनांसह व्यवहार करणार्‍या व्यापा-यांना आता खाती देण्यास बॅंकांवर कोणतीही बंदी नसल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या आठवड्यात क्रिप्टो चलन विनिमय युनोकॉइनला सांगितले. बँकिंग नियामक, युनोकॉईनचे सह-संस्थापक बी. व्ही. हरीश यांनी व्हर्च्युअल चलनांवर बंदी असल्याच्या पार्श्वभूमीवर माहितीच्या अधिकाराखाली हरीश यांनी विचारणा केली असता त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आता अशा व्यवहारांना बंदी नसल्याचे आरबीआयने म्हटले. बिटकॉनसारख्या आभासी चलनाला विरोध केल्यानंतर क्रिप्टो ट्रेडर्स खातेदेखील आभासी चलनात येत असल्याचे सांगत न्यायालयाने क्रिप्टो ट्रेडर्सच्या खात्यांना विरोध दर्शवला होता.

यावरून युनोकॉईनचे सह-संस्थापक बी. व्ही. हरीश यांनी व्हर्च्युअल चलनाला बंदी का, असा प्रश्न करत माहिती अधिकाराखाली आरबीआयला विचारणा केली. त्यामुळे हरीश यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आमची मनाई नाही असे आरबीआयने म्हटले. दरम्यान, एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि बँक ऑफ बडोदा-या काही प्रमुख बँकांनाही हरीश यांनी व्हर्च्युअल चलनाद्वारे व्यवहार करणारे क्रिप्टो व्यापारांच्या बॅंक खात्याविषयी विचारले असता या बॅंकांनी हरीश यांना ठोस उत्तर देणे तूर्तास टाळले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER