लक्ष्मी विलास बँकेवर आरबीआयचे निर्बंध

Lakshmi Vilas Bank - RBI

नवी दिल्ली : लक्ष्मी विलास बँक (Lakshmi Vilas Bank) आर्थिक संकटात सापडल्याने आरबीआयने (RBI) या बँकेवर निर्बंध लादले आहेत. या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे. 16 डिसेंबरपर्यंत हे निर्बंध लागू असून बँकेच्या खातेदारांना महिनाभरासाठी केवळ 25 हजारांची रोख रक्कम काढता येणार आहे.

रिझर्व्ह बँकेने केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध घातले आहेत. रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेला सिंगापूरच्या डीबीएस बँक इंडिया या कंपनीत विलीन करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. विलीनीकरणामुळे डीबीएस समूहाला भारतात बँकिंग परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून लक्ष्मी विलास बँक तोट्यात आहे. बँकेच्या बुडीत कर्जात मोठी वाढ झाली आहे. ही बँक कर्जवसुली करण्यात अपयशी ठरल्याने रिझर्व्ह बँकेला ही कारवाई करावी लागली आहे. व्ही.एस. रामलिंगा चेट्टीर यांच्या अध्यक्षतेखाली तामिळनाडूतील सात उद्योजकांनी एकत्रित येत लक्ष्मी विलास बँकेची स्थापना 1926 मध्ये केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER