नकली नोटांबाबत आर.बी.आय. ची सूचना

RBI - Fake Notes

नवी दिल्ली : बाजारात ५० आणि २०० च्या चलनी नोटांच्याही नकली नोटांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ५० आणि २०० च्या नोट ओळखण्यासाठी नागरिकांना सतर्क केले आहे. RBI ने असे काही मार्ग सांगितले असून ज्यांमुळे ५० आणि २०० च्या नोट या खऱ्या आहेत की खोट्या हे लगेच ओळखता येईल.

यापूर्वीही नकली नोटांच्या छपाईसंदर्भातील अनेक घटना समोर आल्या आहेत. नकली नोट छापणाऱ्या टोळ्यांनी खऱ्या चलनी नोटांच्या हुबेहूब नकली नोटा छापून त्या मार्केटमध्ये वितरीत करत आहेत. यामुळे सामान्यांना खरी चलनी नोट आणि हुबेहूब नकली नोट याच्यातील फरकच कळत नाही.

अशा ओळखा नकली नोट

बाजारात ५०० आणि २००० च्या नकली नोटांचा भांडाफोड़ झाल्यानंतर ५० आणि १०० च्या नकली नोटा येण्याची शक्यता आहे. ही शक्यता ओळखूनच (RBI) ने ५० आणि २०० च्या नोट ओळखण्यासाठी नागरिकांना सतर्क केली आहे. तर RBI ने असे काही मार्ग सांगितले आहेत.

यामध्ये ५० च्या खऱ्या नोटमध्ये देवनागरीत ५० लिहिलेले असते. ते नकली नोटवर नसते. त्यामुळे ५० च्या नोटवर ५० लिहिलेलं असेल तरच नोट घ्यावी. मधोमध महात्मा गांधी यांचा फोटो असतो. तसेच माइक्रो लेटर्स मध्ये RBI, भारत, INDIA आणि ५० लिहलेले असते.

नोटच्या मधोमध सुरक्षेचा धागा म्हणजे नोटेची तार असते. तसेच इलेक्ट्रोटाईप (५०) वॉटरमार्क आणि नोटेच्या उजव्या बाजूस आढळतो अशोक स्तंभ दिसतो. स्वच्छ भारत मिशनचा लोगोही आणि घोषणा ही नोटवर पहायला मिळते. ज्या गोष्टी ५० ची नोट ओळखायला मदत करतात त्याच बाबी २०० ची नोट ओळखायला लागू पडतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER