व्याज दर जैसे थे : पत धोरण आढावा बैठक

नवी दिल्ली : आरबीआयने रेपो रेट (RBI Repo Rate) दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. व्याज दारात कोणताही बदल न करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे, गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अर्थसंकल्प जाहीर (Budget announced) झाल्यानंतर प्रथमच समितीची बैठक झाली.

कोरोना महामारी, वाढते इंधन दर आणि अन्य बाबी लक्षात घेता मागील तीन पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. रिझर्व्ह बँकेने २२ मे, २०२० रोजी शेवटचे बदल केले होते.

दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेपो रेट दर चार टक्क्यांवर स्थिर आहे. त्यामुळे ग्राहकांना ईएमआय कर्ज किंवा व्याजदरात कोणताही दिलासा मिळणार नाही. रिझर्व्ह रेपो रेट दरही ३. ३५ वर तर बँक रेट तसेच मार्जिनल स्टॅडिंग फॅसिलीट रेट ४. २५ वर स्थिर ठेवला आहे. रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार २०२१-२२ या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी १०.५ इतका असेल, अर्थव्यवस्थेला गती मिळत असून रिकव्हरीसाठी मुदतवाढीबाबत विचार करण्याची गरज आहे. २०२०-२१ च्या चौथ्या तिमाहीत ( जानेवारी-मार्च) मधील महागाई दर ५.२ टक्के असू शकतो. येत्या आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर ५. ८ वरून घटून ५.२ टक्क्यांवर स्थिराव शकतो, असे दास यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER