आरबीआयची नागरी बँकांना लाभांश वाटपास बंदी

RBI

सांगली :- रिझर्व्ह बँके ऑफ इंडीयाने २ डिसेंबर २०२० रोजी दिलेल्या आदेशानुसार कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर नागरी सहकारी बँकांना ३१ मार्च २०२०अखेरचा लाभांश सभासदांना देण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील नागरी बँक सभासदांना लाभांश वाटप केला जाणार नसल्याची माहिती नागरी बँक सहकारी असोसिएशने पत्रकाव्दारे दिली आहे. आरबीआयच्या (RBI) निर्णयाने नागरी सहकारी बँकांचे कोट्यावधी रुपये वाचतील असा अंदाज आहे.

आरबीआयने ३० सप्टेंबरला नागरी सहकारी बँकांनी लाभांश वाटप करण्याबाबत निर्णय प्रलंबित ठेवला होता. आरबीआयच्या आर्थिक धोरणात बँकांचे टाळेबंद पडताळणी केला. बँकांचे कोरोनाकाळात मोठे नुकसान झाले. भविष्यातील तोट्यापासून बचाव व्हावा यासाठी बँकांनी बचत करावी, सभासदांचा लाभांश देवू नये असे आरबीआयने सुचवले आहे. बँकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी लाभांश वाटपातून वाचणाऱ्या रक्कमेचा उपयोग होणार आहे. पुढील वर्षी बँकांची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर सभासदांच्या या न दिलेल्या लाभांशाची भरपाई करण्याचा नागरी बँका प्रयत्न करतील.अशी आशा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER