कच्च्या मालाच्या किमती वाढल्या : फौंड्री उद्योग अडचणीत

Foundry industry

पुणे :- फौंड्री उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने राज्यातील २५ हजार फौंड्री उद्योग (Foundry industry) अडचणीत सापडले आहेत. कोरोना काळानंतर केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनच्या अटी शिथिल केल्याने उद्योगांची चाके पुन्हा सुरू झाली. अनेक उद्योगांना चांगल्या ऑर्डरही मिळाल्या आहेत; पण कच्च्या मालाचे दर वाढल्याने उद्योग क्षेत्र पुन्हा संकटात आले आहे.

देशभर ट्रॅक्टरची मागणी वाढण्याबरोबर पॅसेंजर व्हेईकलसह कमर्शियल वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून कच्च्या मालाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तीन- चार दिवसांपासून तर दिवसाला कच्च्या मालाची किंमत वाढते आहे. यात प्रामुख्याने पीग आयर्न, निकेल, स्टील, कॉपर याचा समावेश आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या तरी मोठ्या उद्योगांकडून जुन्या दरानेच पक्का माल घेतला जात आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत असून, फौंड्री उद्योग तोट्यात चालवावा लागत आहे.

कोरोना (Corona) अनलॉक नंतर कच्च्या मालाच्या दरात सुमारे 40 ते 50 टक्के वाढ ही फौंड्री उद्योजकांना सोसावी लागत आहे. त्या तुलनेत कारस्टिंगला दर वाढवून मिळत नाही. कच्च्या मालाचे बुकिंग करावयाचे असेल तर त्यासाठी पूर्ण रक्कम अ‌ॅडव्हान्समध्ये भरावी लागत आहे. त्यामुळे कोरोना संकटातून बाहेर पडलेला फौंड्री उद्योग कच्चा मालाच्या वाढत्या किमतीने पुन्हा एकदा अडचणीत आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER