कच्च्या मालाची दर वाढ : कोल्हापूरातील फौंड्री उद्योग अडचणीत

फौंड्री उद्योग

कोल्हापूर : कच्च्या मालाच्या दररोजच्या दरवाढीने कोल्हापुरतील फौंड्री उद्योग सध्या अडचणीत सापडला आहे. कच्च्या मालात ४० टक्के वाढ झाली असून, त्या तुलनेत कास्टिंगला दर मिळत नाही. कास्टिंगलाही दरवाढ मिळण्यासाठी लवकरच फौंड्री उद्योजकांची बैठक होणार आहे.

कोरोनानंतर (Corona) जून महिन्यापासून हळूहळू उद्योग पूर्वपदावर येत आहेत. त्यानुसार ट्रक्टरची मागणी वाढण्याबरोबर पॅसेंजर व्हेईकलसह कमर्शियल वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, गेल्या दोन दर वाढवून मिळत नाही. कच्च्या महिन्यांपासून कच्च्या मालाच्या मालाचे बुकिंग करावयाचे असेल तर किमती अवास्तव वाढत आहेत. तीन- त्यासाठी पूर्ण रक्कम अॅडवहान्समध्ये चार दिवसांपासून तर दिवसाला भरावी लागत आहे. ही रक्कम फौंड्री आयर्न, निकेल, स्टील, कॉपर आणि उद्योजकांकडे असेलच असे नाही. सगळे अलाईज यांच्या किमती वाढत आहेत.

कोईमतूरमधील फौंड्री उद्योग बंद
कच्च्या मालातील दररोजच्या दरवाढीने कोईमतूर येथील छोट्या ४०० फौंड्रीज १६ डिसेंबरपासून बंद ठेवल्या आहेत. बेळगाव येथील ५० टक्के उद्योगही बंद होण्याच्या मार्गावर असून, याबाबत लवकरच पश्चिम महाराष्ट्रातील फौंड्री उद्योजकांची बैठक घेण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER