रविंद्र जडेजा पोहोचला स्पेशल फोर क्लबमध्ये

Ravindra Jadeja-IPL 2020

चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) आयपीएल (IPL2020) मधील सलग तिसऱ्या पराभवात आपल्या टी-20 अर्धशतकाची बोहनी करणाऱ्या रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आणखी एक विक्रम केलाय तो आहे अष्टपैलुत्वाचा.

आयपीएलमध्ये 2000 धावा आणि 50 किंवा अधिक बळी असा टप्पा त्याने हैदराबादविरुध्दच्या सामन्यात गाठला आणि जेकस् कॕलिस, किरेन पोलाॕर्ड व शेन वाॕटसन यांच्या पंक्तीत तो जाऊन बसला. याचाच अर्थ आयपीएलमध्ये असे अष्टपैलुत्वाचे डबल करणारा तो पहिलाच भारतीय आहे. आपल्या हैदराबादविरुध्दच्या 50 धावांच्या खेळीसह 2 हजार धावांचा टप्पा गाठताना त्याला या स्पेशल क्लबमध्ये स्थान मिळाले. त्याच्या नावावर आधीच 110 विकेट आहेत.

विकेटच्या संख्येत तो इतर तिघांच्याही पुढे आहे. शेन वाॕटसनच्या 92, कॕलिसच्या 65 आणि पोलार्डच्या 57 विकेट आहेत. मात्र धावांच्या बाबत शेन वाॕटसन पुढे आहे. वाॕटसनच्या 3627 धावा आहेत तर पोलार्डच्या 2893 व कॕलिसच्या 2427 धावा आहेत. आता यापैकी कॕलिस वगळता इतर तिघे सक्रिय आहेत. त्यामुळे ते अष्टपैलूत्वाची ही कामगिरी आणखी सुधारु शकतात.

ही बातमी पण वाचा : रवींद्र जडेजा पहिल्या अर्धशतकासाठी खेळलाय तब्बल 241 सामने 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER