रवी शास्त्री म्हणतात, टेस्ट चॕम्पियनशीप फायनल बेस्ट आॕफ थ्री असावी!

ravi shastri - Maharshtra Today

कसोटी क्रिकेटच्या विश्व अजिंक्यपद (World championship of Test Cricket) स्पर्धेच्या विजेतेपदासाठी एकच लढत होणार आहे. 18 जूनपासून साउथम्प्टन येथे ही लढत होणार आहे आणि ती जिंकून भारत (India) किंवा न्यूझीलंडला (New Zealand) कसोटी क्रिकेटचा पहिला विश्वविजेता संघ बनण्याचा मान मिळणार आहे. मात्र जगभरातील संघात गेल्या दोन वर्षात झालेल्या अनेक मालिकानंतर आता केवळ एकच सामन्यात विश्वविजेत्याचा फैसला होणार हे योग्य नसल्याचे मत क्रिकेट जगतात आधीपासुनच आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्री व कर्णधार विराट कोहली यांनी ते स्पष्टपणे बोलून दाखवले आहे.

विश्वविजेता संघ केवळ एकाच सामन्यातून ठरविण्याऐवजी किमान ‘बेस्ट आॕफ थ्री’ अशी मालिका तरी खेळवायला हवी होती असे रवी शास्री यांनी म्हटले आहे. दोन वर्षांच्या मेहनतीचा तोच योग्य समारोप राहिला असता असे शास्री यांचे मत आहे.

क्रिकेटच्या सामन्यांचा कार्यक्रम अतिशय व्यस्त आहे हे मान्य परंतू ही विश्व अजिंक्यपद स्पर्धा पुढेसुध्दा सुरू राहणार असेल तर ‘बेस्ट आॕफ थ्री’ पध्दतीने अंतिम फेरी खेळवणे अधिक योग्य राहिल. शेवटी अडीच वर्षांच्या मेहनतीचा सवाल असतो. हे करताना ते सामने कमीत कमी वेळेत होतील हेसुध्दा बघायला हवे मात्र आता 18 जूनपासून खेळला जाणारा अंतीम सामना हा सर्वात मोठा महत्त्वाचा सामना आहे असे शास्री यांनी म्हटले आहे.

कर्णधार विराट कोहली यानेसुध्दा शास्री यांच्या मताशी सहमती व्यक्त करताना म्हटलेय की, या सामन्याचे महत्त्व फार मोठे आहे कारण क्रिकेटच्या सर्वात खडतर प्रकारातील हा अशा प्रकारचा पहिलाच सामना आहे. आम्हा सर्वांसाठी गेल्या दोन अडीच वर्षातील नाही तर मागच्या पाच-सहा वर्षांतील मेहनतीचे हे फळ आहे. म्हणून अंतिम सामन्यात खेळायचा आम्हाला अतिशय आनंद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button