वाझेंमुळे ‘मातोश्री’ अडचणीत, त्यांचीपण हत्या होऊ शकते, रवी राणांनी व्यक्त केली भीती

मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडल्या स्फोटक प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) याना एनआयएने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होताना दिसून येत आहे. विरोधकांनी थेट याचे धागेदोरे सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांशी जुळलेले असल्याचे म्हटले आहे. त्यातच आता भाजपचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी थेट मुख्यमंत्री यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीचे नाव घेऊन वाझेंच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.

वाझे यांच्यामुळे ‘मातोश्री’ अडचणीत आली आहे. त्यामुळे सचिन वाझे यांचीही हिरेन मनसुख यांच्यासारखी हत्या होऊ शकते. सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित नाही, असा आरोप भाजपचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. येणाऱ्या काही दिवसात वाझे प्रकरणावरुन महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो. फक्त पोलीस आयुक्तांना पदावरुन हटवून हे प्रकरण संपणार नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या आजूबाजूला फिरत आहेत. देवेंद्र फडणवीस मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र, त्यांचा खून झाला. त्याचप्रमाणे सचिन वाझे यांचाही हत्या करण्याची शक्यता आहे, असा दावा रवी राणा यांनी केला.

सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला संपूर्ण माहिती दिली तर मोठा विस्फोट होईल. या सगळ्यात महाराष्ट्र सरकार सामील नाही तर पोलीस आयुक्तांची बदली का करण्यात आली? एनआयएने वाझेंना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवावे. अन्यथा त्यांचाही मनसुख हिरेन होऊ शकतो, अशी भीती भाजप खासदार नवनीत राणा यांनीही व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER