रवीकुमारने आशियाई जेतेपदासह स्वतःला सिध्द केलेय ऑलिंपिक पदकाचे दावेदार

dr-amol-kolhe-said-swarajya-rakshak-sambhajis-end-will-never-change- स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेविषयी अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा पुणे : स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांचे हाल दाखवू नयेत, शेवटच्या एपिसोड्सचे प्रक्षेपण करू नये अशी मागणी अर्जुन खोतकर यांनी केली होती. ही मागणी फेटाळून लावत शुटिंग केलेला कोणताही भाग वगळण्यात येणार नाही, अशी स्पष्टोक्ती अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली आहे. काय दाखवायचे काय नाही हा सर्वस्वी वाहिनीचा निर्णय असतो, असं अमोल कोल्हे म्हणाले. गेली अडीच वर्षे मालिका सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे, परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे, कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल,” असं खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे .

नवी दिल्ली : पहिल्याच फेरीत त्याच्यासमोर अतिशय बलाढ्य प्रतिस्पर्धी होता. थेट विश्वविजेत्याशीच त्याला लढायचे होते पण विश्वविजेता असो की आणखी कुणी, समोर आहे तो केवळ प्रतिस्पर्धी अशा विचाराने बिनधास्त खेळून त्याने हा सुरुवातीचाच डोंगराएवढा अडथळा पार केला आणि दिवसभरात आणखी तीन कुस्त्या जिंकून थेट सुवर्णपदकालाच हात घातला. जिथे बजरंग पुनियासारखा नंबर वन पहिलवान सुवर्णपदक जिंकण्यात अपयशी ठरला तिथे रवीकुमार दहियाने सुवर्णपदक जिंकून ती निराशा भरुन काढली. 57 किलोगटाचा तो विजेता ठरला आणि आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या नावावर फ्रीस्टाईलचे पहिले सुवर्णपदक लागले. नवी दिल्लीतील खाशाबा जाधव स्टेडियममध्ये त्यामुळे तिरंगा सर्वात उंच डौलाने फडकला.

2019 च्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कास्यपदक जिंकलेल्या रावीकुमारचे हे पहिलेच आशियाई सुवर्णपदक आहे. अलीकडेच रोम येथील स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिंपिक सुवर्णपदक हे आपले ध्येय असून त्यादृष्टीने आशियाई स्पर्धा ही उत्तम तयारी असल्याचे त्याने म्हटले आहे. आता या उत्तम तयारीसोबतच सुवर्णपदकही जिंकल्याने टोकियो 2020 मध्ये रवीच्या पदकाच्या आशा बळावल्या आहेत. त्याने स्वतःला आपण ऑलिंपिक पदकाचे दावेदार असल्याचे सिध्द केले आहे. त्यासाठी आता दुखापती टाळत मेहनत करत राहणे अशी दिशा त्याने ठरवली आहे.

आमचा खेळ ऑलिम्पिकपासून लांबच बरा असे ‘केंडो’च्या खेळाडूंना का वाटते?

पहिल्या फेरीत 2017 चा विश्वविजेता जपानी पहिलवान युकी ताकाहाशी ह्याला मात दिल्यावर रवीने अंतिम लढतीत ताजिकीस्तानच्या हिकमातुल्लो व्होहिदोव्ह याला 10-0 अशी मात दिली.

रवीच्या या विजयी मार्गात ताकाहाशीविरुध्दची लढत लक्षात राहणारी ठरली. त्यात पहिल्या सत्रात रवी 0-4 असा पिछाडीवर होता पण दुसऱ्या सत्रात एकच डाव मारुन त्याने चार गूण मिळवले आणि लढत बरोबरीवर आणली. त्याने आक्रमणाला अधिक धार चढवत आणि कोंडीच्या स्थितीतून स्वतःचा चांगला बचाव करत शेवटी ही लढत 14-5 अशी जिंकली आणि फार मोठा अडथळा दूर केला.

उपांत्यपूर्व फेरीची लढतही काहीशी अशीच झाली. मंगोलियाच्या बटजार्गल टग्जविरुध्द तो सुरुवातीला 2-3असा मागेच होता पण नंतर दोन मिनिटांची लढत बाकी असतानाच त्याने या मंगोलियन मल्लाला आसमान दाखवले. उपांत्य लढतीत त्याने कझाकस्तानच्या नुरीस्लाम सनायेव्हविरुध्द सुरुवातीपासून आघाडी घेत 7-2 असा विजय मिळवला.

आपल्या बचावावर तो जास्त भर देतोय कारण त्याला आपल्या टांगांचा बचाव काहीसा कमजोर आहे असे वाटतेय.कुणीही आपल्याला टांग मारु नये यासाठी तो मेहनत घेतोय. इतर मल्लांचे व्हिडिओ बघून त्यांचा तो अभ्यास करतोय आणि त्या अनुषंगाने स्वतःच्या खेळात सुधारणा करतोय. रशियाचे मुराद गैदारोव्ह हे त्याचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात रशियात दररोज नवानवीन आणि बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुध्द खेळून त्याने तयारी चालवली आहे. दररोज नवीन पहिलवानाशी लढताना तेथे आपल्याला बरेच शिकायला मिळाले असे तो मानतो.