राऊतांच्या धमकीला भीक घालत नाही : प्रवीण दरेकर

Praveen darekar-Sanjay Raut

वर्धा : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sirnaik) यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने (ED) धाड टाकल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut)संतापले आणि भाजपाला धमकी दिली – तुमच्या १२० नेत्यांची मी यादी देतो. त्यांच्याही चौकश्या होऊनच जाऊ द्या. यावर भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी उत्तर दिले – आम्ही अशा टार्गेट करण्याला घाबरत नाही. कारण भाजपाच्या नेत्यांचा कारभार स्पष्ट आणि स्वच्छ आहे. दरेकर यांनी राऊतांना टोमणा मारला.

 यादी देऊ असे संजय राऊत यांनी सांगून चार दिवस झाले. राऊत यांनी तत्काळ यादी द्यावी, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केले आहे. संजय राऊत यांनी यादी देण्यासाठी मुहूर्त बघू नये. यादी देऊन टाका. उशीर करू नका.  नाही तर तुम्ही बोलघेवडे आहात असा समज होईल. सत्य जनतेपुढे येऊ द्या! अशा प्रकारची कुठलीही कारवाई भाजपा करत नाही. ईडी ही स्वायत्त संस्था असल्यामुळे ती उगाच कारवाई करत नाही. आली लहर म्हणून कारवाई केली, असे होत नाही. त्याबाबत तक्रार असेल, असे प्रवीण दरेकर म्हणाले. सरकारवर टीका करताना ते म्हणाले, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार नक्कीच कोसळेल. या सरकारमध्ये संवाद नाही.

सरकारमधील नेत्यांचे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण सुरू आहे. याचा कधी तरी शेवट होईल. हे सरकार आतमधून खूप पोखरले आहे. विधान परिषदेच्या जागांचा निकाल लागेल त्यावेळी जनतेचा कौल कळेल. अंतर्गत विसंवादातून हे सरकार कोसळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER