शिवसेनेला १० जनपथचे पायपुसणे करणाऱ्या राऊतांनी मुंबईचे नावही घेऊ नये; भातखळकर यांचा टोमणा

Atul Bhatkhalkar - Sanjay Raut

मुंबई : “शिवसेनेला (Shiv Sena) सोनियांच्या १० जनपथचे पायपुसणे करणाऱ्या राऊतांनी मुंबईचे नाव घेऊ नये. त्यांनी केवळ आपल्या पक्षापुरते बोलावे.” असा टोमणा भाजपाचे (BJP) नेते आ. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मारला.

राऊत म्हणाले होते – “भाजपा एक राष्ट्रीय किंबहुना आंतरराष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना मुंबईत, मुंबईच्या उद्योगांमध्ये, आर्थिक उलाढाली, जमिनींमध्ये रस असल्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेत रस आहे. हे गेले ५० वर्षे सुरू आहे.” याला भातखळकर यांनी उत्तर दिले आहे.

“भाजपाला मुंबईला दिल्लीचं गुलाम, पायपुसणे करायचे आहे. आम्ही ते होऊ देत नाही. त्यांना मुंबई विकायची आहे, घशात घालायची आहे. मुंबई ओरबाडण्याला आमचा विरोध आहे. कोणाच्या शंभर पिढ्या जरी आल्या तरी मुंबई महानगरपालिकेवर आज जो भगवा फडकतोय त्याला हात लावण्याची, तो खाली उतरवण्याचीही हिंमत करणाऱ्यांचे हात जळून खाक होतील एवढी आग त्यात आहे. ” असं राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

“फडणवीस (Devendra Fadnavis) विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर अशी विधाने करू शकतात. जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही, असे भाजपाला वाटत असेल तर जे कोणी भगवा फडकवणार आहेत तो शुद्ध आहे हे जनताच ठरवेल. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच भगवा असून गेली ५० वर्षे तो मुंबई महानगरपालिकेवर (BMC) फडकतो आहे.” असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER