केंद्रीय महिला आयोगाने राऊतांची चौकशी करावी; चंद्रकांत पाटलांची मागणी

Chandrakant Patil & sanjay Raut

मुंबई :- भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीका केली आहे. गेल्या आठवड्यात संजय राऊतांवर एका महिलेने आरोप केले, याची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मांजर डोळे मिटून दूध पिते, तिला कोणी पाहत नाही असे वाटते. असाच काहीसा प्रकार राऊतांचा सुरू आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी अनिल परब, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहे. त्यानंतर राऊतही लगेच सरकारवर टीका करतात. हायकोर्टाने राज्य सरकारच्या बाबतीत केले असते, तर ते प्रयत्न करत आहेत, असे म्हणतात. महाराष्ट्र सरकारडून प्रयत्न सुरू आहेत तर केंद्र काय झोपा काढतंय का? हे चालणार नाही.”

परब आणि घोडावत यांची CBI चौकशी व्हावी – पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्यावरसुद्धा टीका केली आहे. अनिल परब यांचीही चौकशी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे CBIने घोडावत यांचीदेखील चौकशी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “वाझेच्या पत्रात घोडावत आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा उल्लेख आहे. केवळ अनिल परब आणि संजय घोडावत यांची चौकशी करावी, अशी मागणी आहे.”

ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडी संकटाला संधी मानून राजकारण करत नाही; संजय राऊतांनी विरोधकांना खडेबोल 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button