राऊत – फडणवीस भेटीनंतर शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंना तातडीचे बोलावणे ; ‘वर्षा’वर बैठक

Sharad pawar-Uddhav Thackeray

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यातील राजकारणात सरकार असअतिरतेच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. त्यातच आज राष्ट्रवादीचे प्रमुख आणि महाविकास आघाडी सरकारचे समन्वयक शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर पोहचले आहेत.

कालच्या संजय राऊत – देवेंद्र फडणऩवीस यांच्या बेटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज सावध पाऊल टाकत तातडीने वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव टाकरेंसोबत (Uddhav Thackeray) बैठक बोलावली आहे.

बैठकीचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत आणि  देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी पवार-ठाकरे यांची बैठक होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची 26 सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली होती. दुपारी तब्बल दोन तास ते एकत्र होते. संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पुन्हा एकदा राज्यात राजकीय भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत. फडणवीस राऊत यांच्या भेटीने राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आता खुद्द शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेल्याने सगळ्यांच्या नजरा त्यांच्या बैठकीकडे लागल्या आहेत.

आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते हे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER