
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज दुपारी दिल्लीमधील शेतकरी आंदोलकांची भेट घेतली. यावरून भाजपाचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टोमणा मारला – राऊत दिल्लीतील आंदोलकांना भेटले, मात्र कधी मराठा आंदोलकांना भेटले नाही!
राणे यांनी संजय राऊत यांना ढोंगी म्हणत या भेटीवर टीका केली. राऊत यांचा ‘संज्या’ असा एकेरी उल्लेखकरत ट्विट केले – संज्या राऊत जितका झटपट दिल्ली येथील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेला तसा कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आंदोलनाला संज्या कधी गेला नाही; महाराष्ट्रालातले आंदोलनकारी नको, फक्त महाराष्ट्र हे नाव पाहिजे राजकारण करायला … एक नंबर ढोंगी.
संज्या राऊत जितका झटपट दिल्ली येथील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेला तसाच कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आंदोलनाला संज्या कधी गेला नाही, महाराष्ट्रातले आंदोलनकारी नको फक्त महाराष्ट्र हे नाव पाहिजे राजकारण करायला… एक नंबर ढोंगी
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 2, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला