राऊतांना कामधंदा नाही, पोरखेळ सुरू आहे, देवेंद्र फडणवीसांनी सुनावले

Devendra Fadnavis & Sanjay Raut

नागपूर : विधान परिषदेच्या सदस्यांच्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपालांवर टीका केली होती. राजभवनात कोणतं भूत आहे? विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्तीच्या फायली कोणत्या भुताने पळवून नेल्या?, अशी टीका राऊत यांनी केली होती. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना सुनावले आहे. राऊतांना आता कामधंदा नाही, राज्यपालांविरोधातील टीका म्हणजे निव्वळ पोरखेळ आहे. त्याला काय उत्तर द्यायचं?, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.

राजभवनातील विधान परिषदेच्या आमदारांच्या यादीबाबत राजभवनच उत्तर देऊ शकेल. त्यावर मी बोलू शकत नाही. पण भुताटकी, भुताचा वावर ही कसली विधाने आहेत. हा निव्वळ पोरखेळ सुरू आहे. असा पोरखेळ कुणीही करू नये. संजय राऊत यांना काही कामधंदा राहिलेला नाही. ते दिवसभर बेताल बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर उत्तर द्यायचं नसत, असं म्हणत फडणवीस त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

दरम्यान, मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजी छत्रपती राज्याचा दौरा करणार आहेत. त्यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. संभाजी छत्रपती यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. ते २८ मे रोजी मला भेटणार आहेत. त्यावेळी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावर चर्चा करण्यात येईल, असं ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री म्हणून पसंती कोणाला; चुरशीच्या लढतीत फडणवीसांची ठाकरेंवर मात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button