संजय राऊतांची दिल्लीत दोन दिवसांपूर्वीच झाली होती भेट ; भाजपच्या बड्या नेत्याचा खुलासा

Raosaheb danave-Sanjay Raut

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे या भेटीअगोदर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनीही राऊत यांची भेट झाल्याचा दावा केला आहे.

‘दोन-तीन दिवसांपूर्वी संजय राऊत यांची दिल्लीमध्ये भेट झाली होती. मी आणि संजय राऊत शेजारी राहतो. त्यांनी चहा पिण्यासाठी निमंत्रण दिले आणि आम्ही दोघांनी सोबत चहा घेतला होता. अशीच काल दोन राजकीय नेत्यांची भेट झाली. या भेटीमध्ये एकत्र बसतात, चर्चा करतात; पण अशा भेटीतून फार राजकीय चर्चा होत नसते, असेही रावसाहेब दानवे यांनी सांगितले .

दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची काल (२६ सप्टेंबर) दुपारी गुप्त भेट झाली. मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाली. याअगोदर बरोबर आठवडाभरापूर्वी (१८ सप्टेंबर) केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नवी दिल्लीतल्या संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. दानवे-राऊत भेटीनंतर फडणवीस-राऊत भेट झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहेत.

ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडी सरकार पायात पाय घालून पडत असेल तर दोष आम्हाला देऊ नये; भाजप नेत्याचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER