भाजपचा पलटवार : वाझे गृहमंत्र्यांचा भरवशाचा माणूस होता हे अखेर राऊतांनी मान्य केलेच !

Sanjay Raut - Sachin Vaze - Anil Deshmukh - Devendra Fadnavis - Maharashtra Today

मुंबई : मनसुख हिरेन (Mansukh Hiren) प्रकरण आणि उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटके प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे विरोधकांकडून झालेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) कोंडीत सापडलेले असताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचं रोखठोक आज चर्चेचा विषय ठरला आहे. संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह (Devendra Fadnavis) ठाकरे सरकारवरही राऊत यांनी निशाणा साधला होता. राऊत यांच्या लेखाचा हवाला देत भाजपाने शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) पलटवार केला आहे.

संजय राऊत यांनी लिहिलेल्या रोखठोक सदरातील लिखाणाचा संदर्भ देत भाजपाने ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केली आहे. “सचिन वाझे हा शिवसेनेचा, गृहमंत्र्यांच्या आणि मंत्रिमंडळातील इतर लोकांचा लाडका आणि भरवशाचा माणूस होता, हे स्वतः संजय राऊत (Sanjay Raut) यांनीच कबूल केलं आहे. वाझे वसुली करत होता, हे सगळ्यांना माहीत होतं. कृत्य बाहेर आलं म्हणून सारवासारव करण्याचा तुमचा कारभार जनतेला माहीत आहे. ” अशी टीका भाजपाने केली आहे.

एक मोठ्या हुद्द्यावरचा अधिकारी थेट गृहमंत्र्यांवर आरोप करतो. त्याबद्दल आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) एक शब्दसुद्धा काढत नाहीत. स्वतःच्या गृहमंत्र्यांवर विश्वास नाही की त्या अधिकाऱ्यांवर? तुमच्या ‘डॅमेज’ झालेल्या सरकारची झळ महाराष्ट्राच्या जनतेला सोसावी लागत आहे, असा टोलाही भाजपाने (BJP) लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button