राऊत यांनी त्या महिलेचे सर्व आरोप फेटाळले, म्हणाले… ती माझ्या मुलीसारखी

Sanjay Raut

मुंबई : मुंबईतील एका डॉक्टर महिलेने (doctor woman) केलेले सर्व आरोप शिवसेनेचे (Shivsena) प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फेटाळून लावले. ‘याचिकादार महिलेनं तिच्या कौटुंबिक कलहातून निर्माण झालेल्या गैरसमजामुळं विनाकारण माझ्यावर आरोप केले आहेत. ती माझ्या मुलीसारखी आहे,’ असे म्हणत राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात आपली बाजू स्पष्ट केली.

राऊत यांच्या बाजूने उभे असलेले वरिष्ठ वकील प्रसाद ढाकेफाळकर यांनी तिन्ही एफआयआरची कसून चौकशीची मागणी करण्यासाठी डॉक्टर महिलेने दाखल केलेल्या याचिकेचा पुरजोर विरोध केला. तर महिलेकडून अ‍ॅड. आभा सिंग आणि आदित्य प्रताप यांनी या महिलेचा राऊत यांनी छळ केल्याचा आरोप केला. णि सांगितले की तिने तिच्यावर हल्ला केलेल्या अज्ञात व्यक्तींविरोधात २०१३ आणि २०१८ मध्ये माहीम आणि वाकोला पोलिस ठाण्यात तीन एफआयआर नोंदवले असले तरी पोलिसांनी कुठलीच चौकशी व गुन्हा दाखल केला नाही.

संजय राऊत यांच्या वकिलांनी हे आरोप खोडून काढले. ‘महिलेसोबत माझे पूर्वीपासून कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तिला आणि तिच्या पतीला मी पूर्वीपासून ओळखतो. त्या दोघांमध्ये सुरू असलेल्या वादात मी पतीची बाजू घेतोय, असं वाटत असल्यानं तिनं माझ्याविरोधात विनाकारण आरोप केले आहेत, असा दावा संजय राऊत यांच्यामार्फत करण्यात आला. तर महिलेच्या वकिलांनी त्यांचा हा दावा खोडून काढत वैवाहिक संबंध चांगले असल्याचे सांगितले.

याचिकादार महिलेनं २०१३ पासून पोलिसांत तीन एफआयआर नोंदवले आहेत. ही खूप जुनी प्रकरणं आहेत. एकाही एफआयआरमध्ये माझं नाव नाही. २०१३ मध्ये वाकोला पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या एफआयआर प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले, तर नंतरच्या अन्य दोन एफआयआर प्रकरणात पोलिसांनी ‘ए समरी’ अहवाल दाखल केले आहेत. तरीही महिलेला काही आक्षेप असतील तर तिनं न्यायदंडाधिकारी न्यायालयात जायला हवं’, असं म्हणणं राऊत यांच्या वकिलांनी मांडलं.

तूर्तास पोलिसांनी पहिल्या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्राची प्रत याचिकादार महिलेला आणि संजय राऊत यांना सोमवारपर्यंत द्यावी. तसंच, याचिकादारानं आरोपपत्रातील आरोप तपासून पाहावेत आणि त्यानंतर म्हणणं मांडावं’, असे निर्देश न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने देत पुढील सुनावणी १९ मार्चला ठेवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER