
मुंबई : नेहमी भाजपावर (BJP) टीका करणारे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टोमणा मारला – भाजपावर टीका केल्याशिवाय संजय राऊत (Sanjay Raut) यांना झोप देखील लागत नसेल! राज्यात कोणतीही घटना घडली तर त्यात केवळ भाजपाचा हात असतो, अशा विचारसरणीची ही विरोधक मंडळी आहेत. त्यात संजय राऊत यांना भाजपावर टीका केल्याशिवाय झोपदेखील लागत नसेल. पराभव दिसू लागला की यांचे टीकास्त्र सुरू होते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून खालील मुद्दे मांडले :
- राज्यात काहीही झाले, पाऊस कमी-जास्त पडला तरी त्यात भाजपाचा हात आहे, असे प्रत्येक वेळेस राज्य सरकारला वाटते.
- संजय राऊतांना भाजपावर दिवसभरातून १० वेळा टीका केल्याशिवाय झोपच लागत नाही!
- मला खरे बोलण्याची आणि वस्तुस्थिती मांडण्याची सवय आहे, स्वप्नात रमण्याची नाही! त्यामुळे मी असे म्हटले की, माझ्यावर वारंवार टीका करून तुम्हाला शरद पवार मुख्यमंत्री करणार नाही, मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर ते सुप्रियाताईला मुख्यमंत्री करतील.
- महाराष्ट्राच्या संस्कृतीने देशाला दिशा दिली, मग आता महाविकास आघाडी सरकारला कोणाच्या शरीरयष्टीवर, कोणाच्या आडनावावर बोलण्याची संस्कृती आणायची आहे का महाराष्ट्रात?
- एखाद्या यंत्रणेने राज्य सरकारसाठी अनुकूल काम केले तर ते चांगले; पण त्याच यंत्रणेने चौकशी केली आणि त्याचा त्रास झाला की त्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप राज्य सरकार करते.
- पदवीधर निवडणुकीत पराभव दिसत असल्याने जयंत पाटील यांनी पराभवाची कारणे लिहायला सुरुवात केली आहे.
- राज्य सरकार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही; ती आमची संस्कृती नाही.
राज्यात कोणतीही घटना घडली तर त्यात केवळ भाजपाचा हात असतो, अशा विचारसरणीची ही विरोधक मंडळी आहे. त्यात संजय राऊत यांना भाजपावर टीका केल्याशिवाय झोपदेखील लागत नसेल. स्वतःचा पराभव समोर दिसू लागला की, यांचं टीकासत्र आपोआप सुरू होतं. pic.twitter.com/QzALLL5MlE
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 24, 2020
ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरे हे पक्ष चालवण्यासाठीच जन्मले – चंद्रकांत पाटील
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला