शिवसेना नगरसेवकाच्या अटकेवरून राऊत गृहमंत्र्यांवर संतापले; म्हणाले, शिवसेनेला वेगळा न्याय का?

Dilip Walse Patil - Sanjay Raut

पुणे : खेड पंचायत समितीच्या सदस्यांना फोडल्यावरून शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच संतापले आहेत. शिवसेनेचे नगरसेवक फोडून राष्ट्रवादीचे (NCP) आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांनी सेनेची सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे संजय राऊत यांनी स्वत: खेडमध्ये जाऊन दिलीप मोहिते पाटील यांना येत्या निवडणुकीत पाडण्याचा निर्धार केला. तसेच खेडमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांच्या अटकेनंतर प्रसिद्धी देण्यावरूनही त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यावरही निशाणा साधला.

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांच्या मुलाने गोळीबार केला. त्याला पोलिसांनी अटक केली. मात्र त्याला बुरखा घालून मीडियासमोर आणलं नाही. पण खेड परिसरात कुणी तरी गोळीबार केला, त्यावर या भागातले शिवसैनिक, सभापती, नगरसेवकाला तुम्ही अज्ञाताच्या गोळीबाराखाली अटक करता, काळा बुरखा घालता, माध्यमांसमोर आणता, मग इतर ठिकाणी अशी कारवाई का नाही? हा काय प्रकार आहे? कायदा सर्वांसाठी सारखा असेल, गृहमंत्री आपले आहेत, सर्वांचे आहेत, शिवसेनेला वेगळा न्याय का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी गृहमंत्र्यांवर निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button