राऊत आणि फडणवीस भेट : शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर दबावाची खेळी?

Sanjay Raut And Devendra Fadnavis

मुंबई : शनिवारी शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या महामंडळाच्या वाटपावर महाविकास आघाडीत सध्या चर्चा सुरू आहे.

महामंडळांवर आपल्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लागावी यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आघाडीत सर्वच काही आलबेल नाही असं सांगितलं जात आहे. राऊतांनी फडणवीसांची भेट घेऊन दबावाची खेळी खेळली असावी असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महत्त्वाच्या महामंडळांवर दावा केला आहे.

तर शिवसेनेलाही महत्त्वाची महामंडळं आपल्या वाट्याला हवी आहेत. सत्तेत राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. आपली कामे होत नाहीत अशी नाराजी शिवसेनेत आहे. तर मंत्रिमंडळात तडजोड करावी लागल्याने आता महामंडळाचं वाटप करताना काँग्रेसने प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे. या मतभेदांमुळेच शुक्रवारी झालेली बैठक अर्धवट सोडावी लागली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राऊत-फडणवीस भेटीमुळे शिवसेनेने अचूक  टायमिंग साधलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER