‘रात्रीस खेळ चाले’ आता ‘रात का खेल है सारा’

रात का खेल है सारा

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ आता हिंदीतही पाहायला मिळणार आहे. या मालिकेची वाढती लोकप्रियता पाहून ती हिंदीमध्ये डब करण्यात आली आहे. हिंदी मालिकेचे नाव ‘रात का खेल है सारा’ असे ठेवण्यात आले असून अँड टीव्ही वाहिनीवर ती पाहायला मिळणार आहे. २९ फेब्रुवारीला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले-२’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.

मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या भाग-२ वरदेखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मुख्य म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले-२’ मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. नाईकांचा वाडा आणि आयेपासून सुशल्या, दत्ता, नेने वकील, अभिराम, विश्वासराव अशा अनेक मंडळींनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. कोकणाच्या पार्श्वभूमीवर चित्रित  झालेल्या या मालिकेला सुरुवातीला विरोध झाला.

मात्र आता २०० भागांच्या टप्प्यापर्यंत ही मालिका पोहचली होती. या मालिकेची लोकप्रियता पाहता आता हीच  मालिका हिंदीमध्ये पाहायला मिळणार आहे.

Web Title : Ratris khel chale serial dub into hindi as raat ka khel hai sara