जाणून घ्या.. रात्री झोपण्यापूर्वी केस धुण्याचे दुष्परिणाम

hair wash

अनेक लोकांना रात्री झोपण्यापूर्वी केस धुवून झोपण्याची सवय असते. परंतु ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केल्यानं किंवा केस धुतल्यानं सर्दी, ताप यांसारख्या आजारांसोबतच शरीराशी संबंधित अनेक गंभीर आजारही होतात.

  • केसांमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
  • ओल्या केसांनी झोपल्याने अंगदुखी किंवा मानेच्या भागातील मांसपेशींना असह्य वेदना होतात.

  • जास्त ठंड तापमान जाणवत असलेल्या पेंशींना हायपोथेरमीया होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.

  • ओल्या केसांमध्ये झोपल्यामुळे डोक्यातील त्वचेवर ओलावा राहतो. त्यामुळे केसांमध्ये खाज येते.

  • ओले केस पटकन तुटतात. जर तुम्ही नेहमी ओल्या केसांनी झोपत असाल तर केस गळण्याचे प्रमाण वाढते. ओल्या केसांची मुळं नाजूक – होतात. यामुळेच केस गळण्याचे प्रमाण वाढते.

  • ओल्या केसांमुळे डोक्यातील त्वचेतही ओलावा राहतो. त्यामुळे डोक्यात कोंडा होण्याची शक्यता असते.

  • ओल्या केसांनी झोपल्यामुळे डोकेदुखीची समस्या अनेकदा भेडसावते. म्हणून शक्यतो रात्री केस धुणे टाळाच.