रत्नागिरी जिल्हा परिषदेचे शाळा निर्जंतुकरणाचे ग्रामपंचायतींना आदेश

Ratnagiri ZP

रत्नागिरी/प्रतिनिधी : कोरोना विलगीकरण कक्ष म्हणून वापरल्या गेल्याने जिल्हा परिषदांच्या सर्व शाळा त्या त्या ग्रामपंचायतींनी निर्जंतुक करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विषयक सुविधाही उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. राज्य सरकार लवकरच शाळा सुरू करण्याचा विचार करत असून त्याचसाठी त्या निर्जंतुक करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.

अनेक शाळांचा वापर गावागावातून विलगीकरण कक्ष म्हणून करण्यात आला होता. त्यामुळे आता शाळा पुन्हा सुरू करायच्या तर त्या निर्जंतुक असाव्यात, अशी मागणी पालकांनाडून होत आहे. लहान मुले शाळेत येणार असल्याने त्यांच्या आरोग्याविषयी योग्य ती काळजी शासनाने घ्यावी, अशी अपेक्षा पालक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे शाळांचे निर्जंतुकीकरण त्या त्या ग्रामपंचायतींनी करावे असे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेखी पत्रकाद्वारे काढले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतींनी शाळांमध्ये साबण, मास्क, सॅनिटायझर या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही सुचवले आहे. त्यासाठी १५ व्या वित्तआयोग आणि महिला आणि बालकल्याण निधी अथवा ग्रामनिधीतून खर्च करावा, असेही या आदेशात सुचवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER