रत्नागिरीत राष्ट्रवादीची शिवसेनेला तंबी ; फॉर्म्युल्यानुसार सभापतीपद द्या, अन्यथा…

Shivsena-NCP

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेत (Ratnagiri ZP) राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेतील (Shivsena) मतभेद चव्हाट्यावर आले आहे . राष्ट्रवादीने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) फॉर्म्युल्यानुसार एक सभापतीपद मिळावे, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. सभापतीपद न दिल्यास अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार उभा करण्याचा इशारा दिला आहे. येत्या 22 मार्चला रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती पदासाठी निवडणूक होणार आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे 15 सदस्य आहेत. सभापतीपद मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी शिवसेना नेत्यांना पत्र लिहिले आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांना पत्र लिहिले .

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापतींची निवड येत्या 22 मार्चला होणार आहे. सव्वा सव्वा वर्षांसाठी शिवसेनेने ही सर्व पदं वाटून दिली होती. कोरोना काळात काम करण्याची संधी मिळाली नाही म्हणून सव्वा वर्ष पूर्ण झालेल्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून चर्चा सुरु होती. मात्र शिवसेनेच्या आदेशानुसार या सर्वांनी राजीनामा दिला होता.

आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी चिरंजीव अजून राष्ट्रवादीत आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या भास्कर जाधव यांच्या चिरंजीवाचे नाव रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी चर्चेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER