भास्कर जाधवांच्या ‘राष्ट्रवादी’वासी चिरंजीवांवर ‘शिवसेने’ची कृपा ; विक्रांत जाधवांना ZP अध्यक्षपद

Maharashtra Today

रत्नागिरी : मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) यांची नाराजी दूर करण्यासाठी ‘शिवसेनेने महत्वाचे पाऊल उचलले आहेत. भास्कर जाधव यांच्या चिरंजीवांना रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. भास्कर जाधव शिवसेनेत आले असले, तरी विक्रांत जाधव (Vikrant Jadhav) अजूनही राष्ट्रवादीत आहेत.

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्यासाठी आज निवडणूक होत आहे. बारा वाजेपर्यत उमेदवारी अर्ज भरण्याची तर दुपारी अडीच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. शिवसेनेला रत्नागिरी जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 39 इतकं संख्याबळ आहे.

राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या भास्कर जाधवांची नाराजी दूर करण्यासाठी चिरंजीवांना संधी देण्यात येत आहे. विक्रांत जाधव यांच्या नावावर मातोश्रीवरुन शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. भास्कर जाधव यांचे बंधू बाळ जाधव यांच्यासाठीही खासदार विनायक राऊत यांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. परंतु काका आणि पुतण्यामधील शर्यतीत पुतण्याने बाजी मारल्याचे दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER