रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक ; अध्यक्षपदासाठी काका आणि पुतण्यामध्ये पदासाठी चुरस

मुंबई : रत्नागिरी जिल्हा परिषद (Ratnagiri ZP Election) अध्यक्ष आणि सभापतींची निवड येत्या 22 मार्चला होणार आहे. हे पाहता अध्यक्ष पदाची निवडणुक रंगतदार अवस्थेत आलीय. कारण आता इथं काका आणि पुतण्यामध्ये पदासाठी चुरस पहायला मिळणार आहे. कारण भास्कर जाधवांचे (Bhaskar Jadhav) चिरंजीव विक्रांत जाधव (Vikrant Jadhav) या पदासाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचे बंधू बाळ जाधव (Bal Jadhav) अध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत.

सव्वा सव्वा वर्षांसाठी शिवसेनेने ही सर्व पदं वाटून दिली होती. कोरोना काळात काम करण्याची संधी मिळाली नाही म्हणून सव्वा वर्ष पूर्ण झालेल्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून चर्चा सुरु होती. मात्र शिवसेनेच्या आदेशानुसार या सर्वांनी राजीनामा दिला होता.

मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या चिरंजीवांचे नाव चर्चेत आहे. पण विक्रांत जाधव अजूनही राष्ट्रवादीत असल्यामुळे त्यांना कशी संधी देता यावरून शिवसेनेत चर्चा सुरु आहे .

भास्कर जाधवांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला तरी चिरंजीव अजून राष्ट्रवादीत आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या चिरंजीवाचे नाव चर्चेत आहे. भास्कर जाधव यांनी मुलासाठी फिल्डिंग सुरु केली आहे. तर इकडे बाळाशेठ जाधव यांच्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी फिल्डिंग लावली आहे. दुसरीकडे पालकमंत्री असलेले उदय सामंत हे मातोश्रीवर कुणाच्या नावाची शिफारस करतात, हे पाहणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER