रत्नागिरीतील एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 80% पगार?

Ratnagiri ST employees will get 80% salary

रत्नागिरी/प्रतिनिधी : उत्पन्न घटल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला असून भिवंडीसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ अशा अनेक जिल्ह्यांमधील कर्मचार्‍यांना नोव्हेंबर महिन्याचे ६० ते ८५ टक्केच वेतन डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे.

राज्यातील एसटीच्या अनेक आगारांमध्ये आर्थिक अडचणींमुळे संपूर्ण वेतन देता येत नसल्याची नोटीस लावण्यात आली आहे. आगार आर्थिक अडचणीत असल्याने दोन दिवस जवळपास सर्व बसफेऱ्यहीरद्द करण्याची नामुष्की रत्नागिरी आगारावर काही दिवसांपूर्वी उदभवली होती. आर्थिक अडचणींमुळे वेतन कपात करावी लागण्याची एसटी महामंडळाची ही पहिलीच वेळ आहे. या महिन्यात रत्नागिरी आगारामधील कर्मचार्‍यांना एकूण वेतनाच्या ८० टक्के, सिंधुदुर्ग आगारात ८५ टक्के, यवतमाळमधील एका आगारात ७० टक्के, ब्रह्मपुरी आगारात ६० टक्के, गडचिरोली आगारात ६० टक्केच वेतन मिळणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.