
रत्नागिरी(प्रतिनिधी): लॉकडाऊनमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद होती. यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील विविध शहरातील पी आर एस काउंटरही बंद ठेवण्यात आले होते, मात्र आजपासून विविध शहरातील पी आर एस काउंटर सुरू करण्यात आले आहेत. माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, उडप्पी, कुमटा, बेंदूर येथील कोकण रेल्वेचे काउंटर आजपासून सुरू करण्यात आले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला