रत्नागिरी धक्कादायक : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचा पोलिसावर हल्ला

Prisoner

रत्नागिरी : रत्नागिरी विशेष कारागृहात जन्ठेपेची शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने पोलिसावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोर कैद्याला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याला ठेवण्यात आलेल्या सर्कल ३ मधून बाहेर येऊन सर्कल २ समोर विनापरवाना फिरत असताना हटकल्याने त्याने पोलिसावर हल्ला केला. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणी सदर कैद्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER