उत्तर रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्षपदी डॉ. विनय नातू यांची नियुक्ती – आ. प्रसाद लाड

Vinay Natu - Prasad Lad

रत्नागिरी/प्रतिनिधी : भाजपच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार डॉ. विनय नातू यांची नियुक्ती नक्की करण्याचा निर्णय झाल्याची घोषणा कोकण प्रभारी भा.ज.पा प्रदेश उपाध्यक्ष आ.प्रसाद लाड यांनी केली.

प्रदेशाध्यक्ष, प्रदेश संघटन, सरचिटणीस तसेच कोकण भाजपचे संघटन मंत्री, कोकणचे प्रभारी आ. रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनुसार डॉ. विनय नातू यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचे निश्चित झाले असून या संदर्भातील नियुक्तीचे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांनी दिले आहेत.

आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील दोन्ही विभागांचा कार्यभार ऍड. दीपक पटवर्धन यांच्याकडे होता. या नियुक्तीमुळे आता उत्तर रत्नागिरीचा कार्यभार ऍड. दीपक पटवर्धन हे डॉ. विनय नातू यांच्याकडे सोपवतील, अशी माहिती आ. प्रसाद लाड यांनी दिली व डॉ. विनय नातू यांचे अभिनंदन केले आहे.