रत्नागिरी: बसचालक-वाहकाला मारहाणप्रकरणी आठ जणांना अटक

Eight arrested for beating bus driver

रत्नागिरी/प्रतिनिधी : एसटी बस स्विफ्ट कारला घासल्याचे निमित्त करून सिनेमा स्टाईलने बसचा पाठलाग करत आगारात घुसून बसचालक व वाहकास बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आठ जणांना अटक करून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

येथील आगारातील वाहक स्वप्निल सुधाकर सावर्डेकर (३५, रा.कुंभार्ली- चिपळूण) व चालक नितीन कारंडे यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झालेल्या रमेश यशवंत पवार (५२), अक्षय रमेश पवार (२४), समीर सुरेश पवार (२८), अशोक यशवंत पवार (४८), उषा अशोक पवार (३९), रोहन रामचंद्र पवार (२८), अंकित पवार (सर्व रा. बहादूरशेखनाका- वडार कॉलनी) यांना अटक करण्यात आली आहे.