रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनने मागितली राज्यसरकारकडून मदत

रत्नागिरी/प्रतिनिधी :-  लॉकडाऊनमुळे फोटोग्राफी व्यवसाय पूर्ण बंद पडला असून या व्यवसायावर आर्थिक मंदी आली आहे. तरी  आर्थिक चणचणीमुळे रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आर्थिक सहाय्य मागितले आहे.

सध्या देशभरात कोरोनाचा संसर्ग जोरात फैलावत आहे. त्यामुळे सरकारने जनता कर्फ्यू व लॉकडाऊनसारखे निर्णय घेतले आहेत. परंतु, लॉकडाऊनमुळे फोटोग्राफी व्यवसायालाही आर्थिक फटका बसला आहे. बहुतांशी स्टुडिओ भाड्याच्या जागेत आहेत, त्यात लॉकडाऊनमुळे 20-25 दिवस स्टुडिओचे काम बंद तसेच या कालावधीमध्ये लग्न समारंभामुळे फोटोग्राफरवर आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे, या उद्भवलेल्या आर्थिक चणचणीमुळे रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी विनंती केली आहे.